खडक ओझर, ता. चांदवड, जि. नाशिक केद्राई माता देवस्थान ट्रस्ट वेबसाईट वर आपले स्वागत.

|| केद्राई माता देवस्थाना बद्दल ||

४ मे १९८४ साली केद्राई देवस्थानची नोंदणी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अन्वये करण्यात आली आहे. रजि. न. ऐ. ८५१

महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात खडकओझर या गावी केद्राई माता हे एक जागृतदेवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे .मुंबई आग्रा नँशनल हायवे क्र. ३ वर वडाळी भोई या गावाजवळुन ६ कि. मी. अंतरावर हे देवस्थान असुन अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार व रविवार या दिवशी प्रचंड गर्दी या ठिकाणी असते. नवसाला पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. केद्राई मातेच्या मंदिराशेजारी प्राचीन शनी,राहु, केतु यांचे मंदिर आहे. केद्राई मातेसमोरील जागेत चारमुखी हनुमान मुर्तीखुपच सुंदर असुन शेजारील मंदिरात शिवलींग आहे. केद्राई माता मंदिरासमोरील टेकडीवर प्राचीन शिवकालीन दिपमाळ पहावयास मिळते. मंदिराच्या बाजुलाच धरण असल्याने ते केद्राई माता धरण म्हणुन प्रसिद्ध आहे. मदिर परीसरातील वड व पिंपळ हे वृक्ष देवस्थानचे वैभव आहेत. विनता नदीच्या तिरावर असलेले हे देवस्थान खुप शांत सुंदर व रमणीय असे आहे.पुरातन काळापासुन चैञ वैद्य नवमीला देवीचा रथ देवस्थानापासुन खडकओझर गावापर्यन्त मोठ्या थाटामाटात निघतो. या रथयाञेला पंच क्रोशीतील सर्व ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने एकञ येतात. नवराञोत्सात दररोज हजारो भाविक मातेच्या चरणी लिन होतात. या कालावधीत मंदिर प्रशासनाकडुन विद्युत रोषणाई व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यचप्रमाणे देवस्थाना पासुन केद्राई ते शिर्डी, केद्राई माता ते गाणगापुर, केद्राई माता ते ञंबकेश्वर असा पायी दिंडी सोहळा दरवर्षी होतो. केद्राई माता देवस्थान पासुन सप्तशृंगी गड २८ कि. मी. व २२ कि. मी. चांदवडचे रेणुका माता देवस्थान आहे.तसेच सह्याद्रीच्या उतर पुर्व रांगेत सप्तशृंगी गडाशेजारील मार्कंडेय पर्वत, धोडप किल्ला, विखारा पहाड कांचन किल्ला इद्रायणी किल्ला चांदवड येथील रेणुका मंदिर, चंद्रेश्वर मंदिर ,ईच्छापु्र्ती गणेश मंदिर सुप्रसिद्ध रंगमहाल अशी २०ते २५ कि. मी. च्या अंतरावर असणारी ऐतिहासीक स्थळे पहावयास मिळतात. शिर्डी चे अंतर येथुन ७० ते ७५ कि. मी आहे. केद्राई मातेबद्दल कितीही बोलल तरी कमीच आहे. अश्या या जागृत देवस्थानाला आपण याव आणि मातेचा आशिर्वाद अवश्य घ्यावा.

अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ

अध्यक्ष
मा. दिवाणी न्यायाधीश सो. चांदवड
उपाध्यक्ष
मा. उप अभियंता सो. सार्व. बांध. विभाग चांदवड
विश्वस्त
मा. तहसीलदार सो. चांदवड
मा. सहा. पोलीस निरीक्षक सो. वडनेर भैरव
मा. सरपंच सो. ग्रा. प. खडक ओझर
सौ. वैशाली बापू निकम
ऍड. विश्वासराव गेणूजी आहेर
श्री. शरद किसन पवार
श्री. भाऊसाहेब पांडुरंग पगार
श्री. भास्कर हिरामण पगार
श्री. सोमनाथ एकनाथ धनाईत
श्री. एन. सी. निकम ( मॅनेजर) (९९२३७४५९५३)

देणगीसाठी बँक तपशील

Kedrai Devsthan Vishwast Mandal Khdak Ozar

Account No: 

31603327433

IFSC Code: 

SBIN0011677

Account Type:

Savings

अधिक माहिती साठी संपर्क
केद्राई देवस्थाना बद्दल माहिती किंवा आपले प्रश्न विचारा

केद्राई माता देवस्थान व परिसर

केद्राई माता देवस्थान व परिसर

Play Video

केद्राई माता देवस्थान

मंदिराचा पत्ता
खडक ओझर ता.चांदवड जि.नाशिक
(मुंबई आग्रा हायवे क्र. NH 3 ,
वडाळी भोई पासून 6 कि.मी.अंतरावर) महाराष्ट्र 423117

Scroll to Top